आयर्नमॅनचा किताब जिंकणार्या दिव्यांग खेळाडू निकेत दलाल यांचा हॉटेलमध्ये दुसर्या मजल्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला.निकेत हे छत्रपती संभाजीनगरच्या माजी उपमहापौर लता दलाल यांचे चिरंजीव होत. निकेत देशातील पहिले तर जगातील पाचवे दिव्यांग आयर्नमॅन होते .दुबईतील 2020 च्या स्पर्धेत निकेत यांनी राष्ट्रीय विक्रम केला होता .स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती .निकेत यांची सायकलिंग, स्विमिंग यासह अन्य खेळप्रकारात जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे . चेन्नई येथील राष्ट्रीय ट्रॉयथॉलन स्पर्धेतही त्यांनी स्वर्णपदक पटकावले होते .दिव्यांग असूनही त्यांनी जिद्दीने आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पूर्ण करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे .६० वर्षांचा चिरतरूण फिटनेस आयकॉन मिलींद सोमण