पुढारी वृत्तसेवा
यकृतात जास्त प्रमाणात चरबी साठल्यास फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते.
पपईमध्ये पपेन एन्झाइम, फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
पपेन पचन सुधारतो, त्यामुळे यकृतावरचा ताण कमी होण्यास मदत होते.
पपईतील अँटी-ऑक्सिडंट्स लिव्हरमधील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करू शकतात.
थेट चरबी जाळत नाही, पण मेटाबॉलिझम सुधारून चरबी साठण्याची प्रक्रिया कमी करू शकते.
तज्ञांच्या मते मर्यादित प्रमाणात पपईच्या बिया डिटॉक्स प्रक्रियेला मदत करू शकतात.
पपई उपचार नाही, पण योग्य आहाराचा भाग म्हणून फायदेशीर ठरू शकते.
नाही. आहार, वजन नियंत्रण, व्यायाम आणि दारू टाळणे अत्यावश्यक आहे.