Diet Tips: आयुर्वेदानुसार दूध, दही आणि तूपासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत?

पुढारी वृत्तसेवा

दूध, दही आणि तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. पण आयुर्वेदामध्ये काही 'विरुद्ध आहार' सांगितले आहेत.

दूधासोबत कधीही मीठ खाऊ नका.

दुधासोबत आंबट फळे, चिंच किंवा लिंबू कधीही घेऊ नका.

दूध घेण्यापूर्वी किंवा नंतर मुळा, मुळ्याची पाने, दोडकी खाणे टाळावे.

अनेकजण साखरेऐवजी गूळ वापरतात, पण दूध आणि गूळ एकत्र घेणे आयुर्वेदानुसार योग्य मानले जात नाही.

दुधासोबत फणस किंवा तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

दह्यासोबत कधीही खीर, दूध किंवा पनीर घेऊ नये.

अन्न गरम असताना दही खाऊ नका. तसेच दह्यासोबत केळी आणि मुळा खाणेही टाळावे.

तूप खाताना कधीही थंड पाणी किंवा थंड दूध पिऊ नये.

सर्वात महत्वाचे म्हणजे दूध, दही किंवा तूप खाताना मद्य हानिकारक असते.