Namdev Gharal
पँगोलिन, ज्याला मराठीत "खवले मांजर" नावानेही ओळखले जाते
याची ओळख म्हणजे त्याच्या शरीरावर असलेले मजबूत खवले जे केराटिन नावाच्या पदार्थापासून बनतात
धोका जाणवल्यास, पँगोलिन आपल्या शरीराचे वेटोळे करून स्वतःला एका चेंडूसारखे बनवतो व स्वताचा बचाव करतो
पँगोलिन हे मुख्यतः निशाचर प्राणी असताता व यांचे खाद्य म्हणजे मुंग्या व किटक
याची लांब चिकट जीभ बिंळामधून झाडांच्या भेगांमधून सहजरित्या वाळवी, किटक पकडू शकते
धोक्यात असलेली प्रजाती : याचे खवले व मांसाला मागणी असल्याने याची अवैध शिकार केली जाते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर व भारतातही त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत वाघाएवढेच संरक्षण दिले जाते.
महाराष्ट्रातील चिपळूण येथील 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने पँगोलिन संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील डुगवे या गावाने पँगोलिनला देवाचे स्थान दिले असून तेथे 'खवलोत्सव' साजरा केला जातो.
व्हिएतनाममध्ये देखील पहिले पँगोलिन पुनर्वसन केंद्र स्थापन केले गेले आहे, जिथे पकडलेल्या पँगोलिनला वाचवून जंगलात परत सोडले जाते.