पुढारी वृत्तसेवा
काजू - खायला अतिशय चविष्ट, शरीराला झटपट ऊर्जा देण्याचे काम करतात.
यात Healthy Fats चा समावेश असतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते, त्वचा चमकदार होते.
पोषक तत्त्वांचा खजिना असलेला बदाम रोज सकाळी भिजवून खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
बदामामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, व्हिटॅमिन-ईमुळे केस, त्वचा सुंदर राहते.
मनुक्यांमध्ये नैसर्गिक गोडवा, भरपूर फायबर व आयर्न असते.
अॅनिमिया दूर होतो आणि पचनक्रिया सुरळीत राहते.
पिस्ता हा चवीसोबतच शरीरातील अँटी-ऑक्सिडंट्सची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, Blood Sugar संतुलित राहते.
मखाने अत्यंत हलके, कमी कॅलरी, कॅल्शियमने भरपूर असते
हाडे आणि दात मजबूत होतात, तसेच तणाव (Stress) कमी होण्यास मदत होते.