पुढारी वृत्तसेवा
नियमित व्यायाम केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते
वजन कमी करण्यास आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते
वज्रासन - जेवणानंतर 5-10 मिनिटे बसल्याने पचन सुधारण्यास मदत होते.
भुजंगासन- पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो आणि शरीर लवचिक राहते.
मंडूकासन - स्वादुपिंडाच्या भागावर ताण येतो; काही लोक याला मधुमेहासाठी उपयुक्त मानतात.
पवनमुक्तासन - पचन सुधारण्यास मदत होते.
ताडासन - शरीराचा समतोल आणि पोश्चर सुधारते.
वृक्षासन - संतुलन आणि एकाग्रता वाढवते.
मात्र, कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.