Leafy Vegetables Benefits : पालकच नव्हे, या ५ पालेभाज्याही कॅल्शियम, लोह आणि फायबरचा उत्तम स्रोत!

पुढारी वृत्तसेवा

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि 'हेल्दी फूड' म्हणून नेहमीच पालकाला प्राधान्य दिले जाते.

फक्त पालकच नाही, तर या ५ पारंपरिक भारतीय पालेभाज्या पोषक घटकांच्या बाबतीत पालकालाही मागे टाकतात!

पालकापेक्षा जास्त लोह मेथीची भाजीत असते. १०० ग्रॅम मेथीमध्ये तब्बल ५.६९ मिलिग्राम लोह आणि २७४ मिलिग्राम कॅल्शियम असते.

जीवनसत्त्वे व खनिजांचा खजिना असलेली तांदुळजाची भाजी पालकापेक्षा अधिक कॅल्शियम आणि लोह पुरवते.

शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिनांसह भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते.

कॅल्शियमने समृद्ध अळूची पाने योग्य पद्धतीने शिजवून खाल्ल्यास आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

हिवाळ्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या १०० ग्रॅम मोहरीच्या पानांमध्ये तब्बल ४०३ मिलिग्राम कॅल्शियम असते.

शरीराला समतोल पोषण मिळण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचा आलटून-पालटून समावेश करा!

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्‍यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍किल करा.