अंजली राऊत
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हे खास 'ब्लॅक पॉलिश' किंवा 'मॅट फिनिश' यामुळे स्त्रियांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हे काही विशेष पोशाखांमध्ये कपड्यांवर सर्वात जास्त उठून दिसते
पांढऱ्या, काळ्या किंवा कोणत्याही डार्क रंगाच्या सुती साड्यांवर (Cotton sarees) ऑक्सिडाइज्ड हार आणि मोठे झुमक्यांमुळे तुमचे सौंदर्य आणखीनच खुलेल.
पांढऱ्या रंगाची कुर्तीसोबत आणि मिस मॅचिंग लेगिंग्स किंवा पांढरा मॅक्सी प्रकारातील ड्रेस यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूपच उठून दिसते, त्यासोबत डार्क रंगाची लिपस्टीप लावा.
जीन्स आणि लांब कॉटन कुर्ती, स्कर्ट आणि क्रॉप टॉप किंवा धोती पँट यांसारख्या इंडो-वेस्टर्न पेहरावावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परफेक्ट मॅच होते.
काळी कुर्ती किंवा काळ्या साडीवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तर 'Boho Look' देत असल्याने तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसतात.
पेस्टल रंगाच्या चिकनकारी कुर्तीवर ऑक्सिडाइज्ड चोकर किंवा मोठे 'चाँदबाली' प्रकारातील झुमके खूपच आकर्षक दिसतात.