Owl Eye|हे माहिती आहे का? घुबडाला डोळ्यांची हालचाल करता येत नाही

Namdev Gharal

घुबड या पक्ष्याचे वैशिष्‍ठ्य म्‍हणजे निशाचर, काही ठिकाणी शूभ तर काही ठिकाणी अशूभ अशी अनेक रहस्य जोडलेला पक्षी

पण घुबडाची शारिरीक वैशिष्‍ठ्ये इतर पक्ष्यापेक्षा वेगळी असतात. त्‍याचे डोळे निसर्गाने खास पद्धतीने बनवलेले असतात , शरिराच्या मानाने त्‍याचे डोळे मोठे असतात

त्यांच्या डोळ्यांमध्ये rod cells जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते अगदी कमी प्रकाशातही शिकार पाहू शकतात.पण त्‍यांच्या डोळ्यांची हालचाल होत नाही

सर्वसामान्य प्राणी पक्षी यांचे डोळे गोल असतात तर घुबडाचे डोळे लांबूडके असतात. व ते ते कवटीच्या हाडांमध्ये घट्ट बसलेले असतात त्‍यामुळे डोळ्यांची हालचाल करता येत नाही

न हलणाऱ्या डोळ्यांची कमी त्‍याची मान भरुन काढते. २७० अंशात मान फिरवण्याची कला त्‍याच्याकडे असते. दोन्ही बाजूनी पूर्णता मागे पाहता येते.

मान पूर्णता मागे वळवण्यासाठी घुबडाची मान अनेक वैशिष्‍ठ्यांनी भरलेली असते. मानसाच्या मानेत ७ मणके असतात तर घुबडाच्या मानेत १४ मणके असतात

त्‍याच्या मानेतील व्हस्‍क्‍युलर सिस्‍टिम वैशिष्‍ठ्यपूर्ण असते. त्‍यामुळे त्‍याच्या मेंदूला रक्‍तपुरवठा व ऑक्‍सिजन पुरवठा मान वळवल्‍यावरही चांगला राहतो.

बहुतांश पक्ष्यांचे डोळे बाजूला असतात, पण घुबडाचे दोन्ही डोळे समोर असतात, त्यामुळे त्‍यांची अंतर मोजण्याची क्षमता इतर पक्ष्यांपेक्षा उत्कृष्ट असते.

या त्‍याच्या वैशिष्‍ठ्यामुळे घुबडाचे डोळे व मान त्‍याला इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी ठरवतात व रात्रीचा ‘शिकारी राजा’ बनवतात

चित्रातल्या कोंबडीसारखी दिसणारी खरीखुरी कोंबडी