पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूड पार्ट्यांपासून अंबानींच्या इव्हेंट्समध्ये सगळीकडे दिसणारा ऑरी कोण आहे?
सोशल मीडिया सेंसेशन ओरहान अवात्रामणी उर्फ ऑरी सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे.
२०२४ पर्यंत ऑरीची एकूण संपत्ती १० कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जातं.
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ऑरी 'स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर' पदावर काम करतो.
ब्रँड कोलॅबोरेशन, इव्हेंट अपिअरन्स आणि प्रमोशनल शूट्समधूनही ऑरी मोठी रक्कम कमावतो.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी किंवा फोटोसाठी ऑरी २० ते ३० लाख रुपये चार्ज करतो.
ऑरीची खरी ओळख बनली बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे फोटो आणि व्हिडिओंमुळे. यामुळेच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
लक्झरी लाइफस्टाईल- महागडे कपडे, ब्रँडेड ॲक्सेसरीज आणि हाई-प्रोफाइल पार्ट्या.
तो अनेकदा अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्येही दिसतो, म्हणजे ऑरीचं सोशल सर्कलही तितकाच पॉवरफुल आहे.