पुढारी वृत्तसेवा
ओरी अर्थात ओरहान अवात्रामणी हे सोशल मीडिया जगतातील एक चर्चित नाव आहे. बॉलिवूड स्टार किड्ससोबतच्या फोटोंमुळे तो कायम चर्चेत असतो.
नोव्हेंबर 2024 मध्ये ओरीने स्वतः खुलासा केला की त्याच्याकडे भारतीय नव्हे तर अमेरिकेचे नागरिकत्व आहे.
ओरीने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत अमेरिकन निवडणुकीत मतदान केल्याची माहिती दिली होती. यानंतर त्याच्या नागरिकत्वाची चर्चा सुरू झाली.
2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपण डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले असल्याचेही ओरीने सार्वजनिकपणे सांगितले होते.
ओरीला अनेकजण 'Bollywood's BFF' म्हणून ओळखतात. कारण तो जवळपास प्रत्येक बॉलिवूड पार्टी आणि सेलिब्रिटी कार्यक्रमात दिसतो.
जान्हवी कपूर, सारा अली खान, न्यासा देवगण यांसारख्या स्टार किड्ससोबत त्याचे जवळचे संबंध आहेत. त्यांच्या फोटोंमुळे तो कायम चर्चेत राहतो.
ओरीने कोणत्याही चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली नाही. तरीही सोशल मीडिया उपस्थितीमुळे तो देशभरात लोकप्रिय झाला आहे.
सेलिब्रिटींसोबत फोटो काढताना खांद्यावर किंवा कमरेजवळ हात ठेवण्याची त्याची खास स्टाईल सोशल मीडियावर अनेकदा मीम्सचा विषय ठरली आहे.
त्याचे लक्झरी लाइफस्टाइल, बॉलिवूडमधील कनेक्शन, सोशल मीडिया प्रभाव आणि वेगवेगळे खुलासे यामुळे ओरी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो.