पुढारी वृत्तसेवा
फणस फळ आहे की भाजी?
वर्षानुवर्षे अनेकांना पडलेला प्रश्न. जाणून घ्या यामागचं खरं विज्ञान!
विज्ञान काय सांगतं?
वनस्पतिशास्त्रानुसार फणस हे फळ आहे. कारण ते झाडावर येतं आणि त्यामध्ये बिया असतात.
मग भाजी का म्हणतात?
कच्च फणस चवीला गोड नसतं. त्यामुळे त्याचा वापर भाजी, रस्सा आणि विविध पदार्थांमध्ये केला जातो.
कच्च्या फणसाची खासियत
कच्च फणस घट्ट, कमी गोड आणि मांसासारखा पोत असलेला असतो. त्यामुळे ते 'व्हेज मटण' म्हणूनही ओळखले जाते.
पिकल्यावर बदलतं रूप
फणस पिकल्यावर त्याचा रंग पिवळा-केशरी होतो. ते रसाळ, मऊ आणि अतिशय गोड लागते.
पिकलेलं फणस म्हणजे...
अननस, केळी आणि आंब्याच्या मिश्र चवीसारखा स्वाद! त्यामुळे ते थेट फळ म्हणून खाल्लं जातं.
जगातील सर्वात मोठं झाडावर येणारं फळ
एका फणसाची लांबी 90 सेंमीपर्यंत आणि वजन तब्बल 36 किलोपर्यंत असू शकतं.
एका झाडाला किती फणस येतात?
पिकलेल्या फणसाच्या झाडाला वर्षाला सुमारे 200 फणस लागू शकतात. काही जुन्या झाडांना 500 पर्यंत फळं लागल्याची नोंद आहे.
फणसाचं काहीही वाया जात नाही
गर, बिया, पाने आणि लाकूडही वापरलं जातं. बिया भाजून खाल्ल्या जातात तर लाकडापासून फर्निचर बनवलं जातं.
उत्तर काय?
कच्च फणस = भाजी, पिकलेलं फणस = फळ, वैज्ञानिकदृष्ट्या = फळ, म्हणून फणस हे फळही आहे आणि स्वयंपाकात भाजीही आहे.