Orchid Mantis |निसर्गाचा चमत्‍कार चालते फिरते फूल : ऑर्किड मँटीस

Namdev Gharal

Orchid Mantis हा किटक म्हणजे चालते फिरते फूल असते, कारण हा किटक खुपच सुंदर असतो व तो ऑर्कीडच्या फुलासारखा दिसताे

या कीटकाचा रंग पांढरा आणि गुलाबी असतो. त्याचे पाय फुलांच्या पाकळ्यांसारखे दिसतात, ज्यामुळे तो फुलांमध्ये सहज मिसळून जातो

इतर प्राणी स्वतःला वाचवण्यासाठी लपतात, पण ऑर्किड मॅंटिस शिकारीला आकर्षित करण्यासाठी फुलाचे रूप घेतो. यालाच 'अ‍ॅग्रेसिव्ह मिमिक्री' म्हणतात

ऑर्किड मँटीस हे कीटक प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियातील (उदा. मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया) पावसाळी जंगलांमध्ये आढळतात

याचा आहार फुलपाखरे, मधमाश्या, माश्या आणि इतर छोटे कीटक हे याचे मुख्य अन्न आहे. फुलावर बसलेला समजून कीटक याच्या जवळ येतात आणि हा क्षणार्धात त्यांची शिकार करतो

याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे आकाराने मोठी (सुमारे ६-७ सेमी) आणि दिसायला अधिक आकर्षक असते. तर हा आकाराने खूप लहान (सुमारे २-३ सेमी) चा असतो

दुसरे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे वातावरणानुसार आणि प्रकाशाच्या तीव्रतेनुसार ऑर्किड मॅंटिस आपला रंग गुलाबी ते गडद तपकिरी दरम्यान बदलू शकतो

हा कीटक तासनतास एका जागी स्थिर राहू शकतो. त्याची एकाग्रता आणि वेग हेच त्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे

Spider Monkey | हे माकड आहे की स्पायडरमॅन?