Orange Peel |‘ही‘ सिक्रेट रेसिपी कळाली तर तुम्ही संत्र्याची साल कधीही फेकणार नाही

Namdev Gharal

संत्री आपण साधारण 60 रुपये किंलोने विकत घेतो पण त्‍याची साल 500 रुपये किलोपर्यंत जाऊ शकते

कारण या सालीमध्येच लपलेले असतात असे घटक की जे चेहऱ्याला महागड्या क्रिमपेक्षाही अधिक उजळ करु शकतात

यासाठी साध्या पद्धतीने तुम्ही घरगुती फेसवॉश करु शकता. जो तुम्ही आठवडाभर जरी चेहऱ्याला लावला तर तुम्हाचा चेहरा टवटवीत होऊ शकतो.

यासाठी दोन संत्र्यांची साल घ्यायची त्‍यामधे अगदी थोडे दुध घ्यायचे व मिक्सरमध्ये ग्राईंड करुन घ्यायाचे

तयार झालेल्या मिश्रणात एक चमचा तांदळाचे पीठ व एक चमचा मध घालायचा आहे. व चांगले एकजीव करा

याची पेस्ट करता येते किंवा बारीक करुन घेतली तरी चेहऱ्याला स्क्रबिंगही करता येतो.

झाला तुमचा घरगुती फेसवॉश तयार, ही पेस्ट तुम्ही आठवडाभर जरी लावला तरी चेहरा असा उजळेल की ब्युटीपार्लरमध्ये फेशियल केल्यासारखा

या पेस्टमुळे चेहरा उजळण्याचे कारण म्हणजे संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन 'C' भरपूर असते, जे त्वचेवरील काळे डाग कमी करून नैसर्गिक चमक आणते

तांदळाच्या पिठाचे कण त्वचेवरील मृत पेशी (Dead cells) काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि सतेज दिसते.

संत्र्याची साल 'नॅचरल ब्लिचिंग एजंट' म्हणून काम करते. तर मध आणि दूध त्वचेला ओलावा देतात. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

पॅच टेस्ट करुन बघा संत्र्याच्या सालीत सायट्रिक ॲसिड असते, त्यामुळे जर तुमची त्वचा खूप संवेदनशील (Sensitive) असेल, तर आधी हातावर थोड्या भागावर लावून बघा. आग होत असल्यास वापरू नका

व्हॅसलिनचा शोध एका टाकाऊ पदार्थापासून लागला