पुढारी वृत्तसेवा
कांदा खरेदी करताना सावध राहा!
बाहेरून चांगला दिसणारा कांदा आतून खराब असू शकतो.
कांद्याची साल तपासा
कांद्याची साल कोरडी आणि कागदासारखी असावी.
ओलसर कांदा घेऊ नका
ओलसर किंवा बुरशी लागलेला कांदा लवकर खराब होऊ शकतो.
कांदा हाताने दाबून पाहा
कांदा घट्ट आणि टणक असावा; मऊ पडलेला कांदा घेऊ नका.
मोड आलेला कांदा खरेदी करू नका?
कांद्याला हिरवे कोंब फुटले असतील, तर तो चांगला नसतो.
काळी बुरशी दिसतेय?
कांद्यावर काळी पावडर किंवा बुरशी दिसल्यास तो खरेदी करणे टाळा.
दुर्गंधी येणारा कांदा टाळा
कांद्याला कुजल्यासारखा वास येत असेल, तर तो खराब असण्याची शक्यता आहे.
प्लास्टिकच्या पिशवीत साठवू नका
प्लास्टिकमध्ये ओलावा साचल्याने कांदा लवकर खराब होऊ शकतो.
कांदा आणि बटाटा वेगवेगळे ठेवा
दोन्ही एकाच टोपलीत ठेवल्यास कांदा लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
कांदा जास्त दिवस टिकवायचा असेल तर…
कांदा कोरड्या, हवेशीर जागेत टोपलीत ठेवा आणि खराब कांदे वेगळे काढा.