Honey and Health : मध गरम पाणी किंवा चहामध्ये मिसळणे सुरक्षित आहे का? आयुर्वेद काय सांगते?

पुढारी वृत्तसेवा

मधाचा वापर हा आयुर्वेदाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. याचा उपयोग घरगुती उपायांपासून अनेक आजारांत औषध म्‍हणून होतो.

मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे; पण मध गरम करणे योग्‍य की अयोग्‍य याचा विचार केला आहे का?

हेल्थ कोच डिंपल जांगडा यांनी अलीकडेच इंस्टाग्राममधील पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, मध गरम केल्याने किंवा दीर्घकाळ साठवून ठेवल्याने हायड्रॉक्सीमेथिलफुरफुरल तयार होते. ते शरीरासाठी हानिकारक असते.

मध गरम केल्‍यास त्‍याचे रुपांतर न पचणारा असा पदार्थ म्‍हणजे शरीरामध्ये विष बनते, असे चरक संहिता सारख्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये नमूद केले आहे.

मध गरम केल्याने यातील डायस्टेस आणि ग्लुकोज ऑक्सिडेज सारख्या पाचनासाठी आवश्यक घटकाचा नाश होतो.

मध गरम केल्याने त्याचे अँटिऑक्सिडंट्ससह जीवनसत्त्वे देखील नष्ट होतात.

मधाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी त्याचे सेवन नैसर्गिक म्हणजेच कच्च्या स्वरूपात करणे अधिक चांगले असते.

आयुर्वेद आणि डॉक्टर दोघेही मधाला नैसर्गिक स्वरूपात खाण्याचा सल्ला देतात.

मध तुम्‍हाला चहा किंवा पाण्‍यासह घेणार असाला तर ते कोमट असावे, जास्त गरम किंवा उकळते नसावे.

पिण्यायोग्य तापमानाला थंड झाल्यावरच चहा किंवा पाण्‍यात मध मिसळावा.

सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे, तुम्ही एक चमचा मध थेट खाऊन त्यावर कोमट पाणी किंवा हर्बल टी पिऊ शकता.

येथे क्‍लिक करा.