Garlic Quality Check : लसूण खरेदी करताय? : 'गंध' आणि 'रंग' सांगेल सत्य! हे फरक तपासाच!
पुढारी वृत्तसेवा
बाजारामध्ये सध्या भेसळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. लसूणही याला अपवाद नाही.
बनावट लसूण केवळ आपल्या आरोग्यावरच नव्हे, तर पदार्थांच्या चवीवरही परिणाम करू शकतो. त्यामुळेच चांगल्या प्रतीचा आणि बनावट लसूण कसा ओळखायचा, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
चांगल्या प्रतीचा लसूण नैसर्गिकरीत्या थोडा असमान आणि डागाळलेला असतो. त्याच्या सालावर हलके तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे डाग असू शकतात.
बनावट लसूण अनेकदा खूप चमकदार आणि एकाच रंगाचा दिसतो. जर लसूण अगदी 'परफेक्ट' आणि चकचकीत वाटत असेल, तर सावधगिरी बाळगा.
खऱ्या लसणाचा वास तीव्र आणि खास असतो. तो फोडल्यास किंवा चिरल्यास लगेच एक तिखट सुगंध जाणवतो.
बनावट लसणामध्ये हा सुगंध खूप हलका असतो किंवा अजिबात नसतो. त्यामुळे लसणातून तिखट वास येत नसेल, तर सावध रहा.
खऱ्या लसणाची चव तिखट आणि चटपटीत असते, ज्यामुळे पदार्थांची चव वाढते.
खऱ्या लसणाचं साल थोडं खरखरीत असतं.
खऱ्या लसणाच्या पाकळ्या अनेकदा असमान आकाराच्या असतात; काही लहान, तर काही मोठ्या.
येथे क्लिक करा.