Namdev Gharal
आजकाला सर्वजण ‘फॅट लॉसच्या मागे लागलेले असतात. पण शरीरासाठी एक फॅट खूप उपयोगी असतात ते म्हणजे ओमेगा ३ फॅटी ॲसिड
ओमेगा-३ फॅटी ॲसिड (Omega-3 Fatty Acid) हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे निरोगी फॅट्स आहेत, जे मानवी शरीर स्वतः तयार करू शकत नाही; त्यामुळे ते आहारातूनच मिळवावे लागते.
फॅट वाढले की कोलेस्ट्रोल त्यामुळे ओबेसिटी हृदयरोग स्नायुंवर ताण हे सगळे जोडून येते पण ओमेगा-३ हे 'एसेंशियल फॅटी ॲसिड' आहे. हे शरीरासाठी 'गुड फॅट्स' असते
हे शरीरातील ट्रायग्लिसराइड्स (खराब फॅट्स) कमी करते, रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करते
मेंदूच्या पेशींच्या बांधणीसाठी ओमेगा-३ (विशेषतः DHA) अत्यंत महत्त्वाचे आहे. हे मानसिक ताण कमी करण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते
दृष्टी आणि हाडे मजबूत : डोळ्यांच्या रेटिनाचे आरोग्य टिकवून अंधत्व रोखते. तसेच यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते.
कोणत्या पदार्थातून मिळते : शाकाहारी आहारातून कसे मिळवण्यासाठी अळशीच्या बिया (Flaxseeds) आणि चिया सीड्स, अक्रोड (Walnuts), सोयाबीन आणि टोफू यातून अधिक प्रमाणात मिळते
मांसाहारी स्रोत कोणतेः फॅटी फिश: सॅल्मन (Salmon), बांगडा (Mackerel), रावस, आणि ट्युना त्यांनतर अंडी, तसेच फिश ऑइल सप्लिमेंट्समधून हे मिळू शकते
निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज साधारण २५० ते ५०० मिलीग्रॅम ओमेगा-३ (EPA + DHA) ची गरज असते. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.