ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये गेल्या दोन सत्रात सुमारे २५ टक्के वाढ झालीय.गेल्या वर्षभरात या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती.बुधवारी (दि.२० ऑगस्ट) हा शेअर्स बीएसईवर १४ टक्के वाढून ५१ रुपयांवर पोहोचला.१९ ऑगस्ट रोजी या शेअर्सने ८.८ टक्के वाढ नोंदवली होती.ओला इलेक्ट्रिकचा शेअर्स २०२५ वर्षात सुमारे ४१ टक्के खाली आला .दरम्यान, बुधवारी 'एनएसई'वर या शेअर्सची तुफान विक्री झाली.आवश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार असल्याचे पीएम मोदींनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केले होते.यात छोट्या कारवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव आहे .जीएसटी कपात केल्यास कार आणि दुचाकीची मागणी वाढू शकते या आशावादामुळे ऑटो शेअर्स वधारले आहेत.विराटसोबत लग्नाआधी अनुष्काची अट काय होती? ७ वर्षांनी फोटोग्राफरचा खुलासा