पुढारी वृत्तसेवा
भेंडी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होतं, असा दावा केला जातो.
भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि कमी कॅलरीज असतात.
भेंडीतील फायबर पचन मंदावते, त्यामुळे भूक कमी लागते आणि ओव्हरईटिंग टाळता येते.
भेंडीचं पाणी मेटाबॉलिझम थेट वाढवतं, असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
भेंडीचं पाणी प्यायल्यामुळे जर कॅलरी इनटेक कमी झाला, तर वजन घटू शकतं.
फक्त भेंडीचं पाणी पिऊन वजन कमी होत नाही; आहार व व्यायाम महत्त्वाचे असतात.
भेंडी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकते.
तज्ज्ञांच्या मते भेंडीचं पाणी सहाय्यक ठरू शकतं, पण ‘जादुई उपाय’ नाही.
भेंडीचं पाणी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैलीसोबतच घ्यावं.