Okra Water | भेंडीचे पाणी महिनाभर उपाशीपोटी प्यायल्याने शरीरात होतात चमत्कारिक बदल

अविनाश सुतार

भेंडीचे पाणी म्हणजे ताजी भेंडी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवली जाते आणि सकाळी त्याचे अर्क स्वरूपात सेवन केले जाते

सकाळी उपाशीपोटी भेंडीचे पाणी प्यायल्यास शरीर त्यातील पोषक घटक अधिक प्रभावीरीत्या शोषून घेतो

भेंडीच्या पाण्यात व्हिटॅमिन C, पॉलीफिनॉल्स आणि फ्लॅवोनॉइड्स ही अँटिऑक्सिडंट्स आढळतात

भेंडीच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स, तंतुमय घटक (फायबर), जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात

भेंडीच्या पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारते

भेंडीचे पाणी मधुमेह असलेल्या आणि इन्सुलिन प्रतिकार असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते

भेंडीच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स स्ट्रेस कमी करतात ज्यामुळे अकाली वार्धक्य आणि त्वचेचे नुकसान टळते

नियमित भेंडीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे शरीराला संसर्गांपासून बचाव करता येतो

भेंडीतील चिकट द्रव्य (mucilage) हे शरीरासाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि लवचिकता टिकते

भेंडीमधील विद्राव्य तंतू (soluble fiber) आणि चिकट द्राव्य (mucilage) पोट आणि आतड्यांना शांत ठेवते

येथे क्लिक करा