अविनाश सुतार
हृदयविकार सुरुवातीला सामान्य तक्रारींमधून दिसून येतो, ज्याकडे लोक बहुधा दुर्लक्ष करतात
मोठा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी साधारण सहा महिन्यांपर्यंत शरीर संकेत देत असते
कारण नसलेला थकवा
थोडे चालणे, जिना चढणे यासारख्या साध्या गोष्टींनंतरच थकवा जाणवत असेल, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते
श्वास घ्यायला त्रास होणे
अचानक श्वास घेण्यास त्रास होणे, झोपेत गुदमरल्यासारखे होणे किंवा झोपताना श्वास अडचणीने घेणे ही लक्षणे गंभीर आहेत
हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाली की फुफ्फुसात पाणी साठते आणि श्वास घेणे कठीण होते
पाय, घोटे किंवा पोट सुजणे
सतत किंवा वाढत जाणारी सूज (जिला ओडिमा म्हणतात), विशेषतः पाय, घोटे किंवा पोटात असेल, तर तपासणी करून घ्या
अपचन, मळमळ किंवा पोटदुखी
जेवल्यानंतर गॅस, अपचन किंवा पोट बिघडल्यासारखे वाटणे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण ही लक्षणे भ्रामक असू शकतात
गरगरणे किंवा बेशुद्ध पडणे
अधूनमधून हलके गरगरणे सामान्य आहे, पण वारंवार गरगरणे किंवा बेशुद्ध पडणे गंभीर आहे
हलकी छातीत अस्वस्थता
छातीचा त्रास नेहमीच तीव्र वेदनेचा नसतो. काही लोकांना छातीत जडपणा, दडपण किंवा हलका दबाव जाणवतो. हा त्रास पाठीमागे किंवा हातातही पसरतो