Anirudha Sankpal
ऑक्टोबर हीटचा त्रास
मान्सून संपल्यानंतर तापमान आणि ह्युमिडिटी वाढल्यामुळे शरीराला उष्णता बाहेर टाकणे कठीण होते, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्यासारखे त्रास बळावतात.
योग्य पेयांची निवड
हायड्रेशन टिकवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू पाणी आणि ताक यांसारख्या चांगल्या पेयांचाच आहारात समावेश करावा.
भरपूर पाणी पिणे
तहान लागण्याची वाट न बघता दिवसभर थोडे-थोडे पाणी नियमितपणे पीत राहावे, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.
पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या
काकडी, कलिंगड, खरबूज, संत्री आणि मोसंबी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळे किंवा भाज्या खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते.
तहान आणि भूकेमधील फरक
भूक लागल्यास एकदम खाण्याऐवजी आधी थोडे पाणी प्यावे, ५ मिनिटे थांबावे आणि मग तहान होती की भूक हे ओळखून खाण्याचा निर्णय घ्यावा.
संतुलित आहार
केवळ ज्यूस किंवा फळांवर अवलंबून न राहता डाळी, दही, पनीर आणि अंडी यांसारख्या प्रोटीनयुक्त स्रोतांचा आहारात समावेश करावा.
इलेक्ट्रोलाइट्स आणि ओआरएस
जास्त घाम आल्यास परिस्थितीनुसार ओआरएस किंवा इलेक्ट्रोलाइट्सची गरज भासू शकते, परंतु उगीच दररोज ओआरएस पिणे टाळावे.
उन्हाची तज्ज्ञांची काळजी
दुपारी कडक ऊन असताना थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे आणि जास्त ताकदीचे वर्कआउट करणे शक्यतो टाळून शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्यावे.