Numerology : 'या' ३ मूलांकांचे पुरुष असतात आदर्श पती

पुढारी वृत्तसेवा

अंकशास्त्रानुसार (Numerology) एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनांकावरून त्याच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडता येतात.

सामान्यतः कुंडलीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो, मात्र मूलांकाच्या मदतीनेही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो.

मुलांक कशा शोधावा ? एखाद्याचा जन्म २८ तारखेला झाला असेल, तर २+८ = १० आणि १+० = १, म्हणजेच त्याचा मूलांक १ असेल.

आपण अशा काही खास मूलांकांबद्दल जाणून घेवूया जे आपल्या जोडीदाराशी अत्यंत प्रामाणिक असतात आणि पत्नीच्या प्रत्येक शब्दाचा मान राखतात.

मूलांक २ : ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला झालेल्‍या पुरुष स्वभावाने अत्यंत सौम्य आणि काळजी घेणारे असतात.

जोडीदार म्‍हणून २ मुलांकाचे पुरुष हे लोक अतिशय योग्य मानले जातात. आपल्या पत्नीच्या लहानातील लहान गोष्टीची काळजी घेणे यांना आवडते. त्‍यामुळेच विश्वासू जोडीदारांच्या यादीत या मूलांकाचे लोक अव्वल स्थानी येतात.

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ असतो.

मूलांक ५ चे जातक अत्यंत रोमँटिक असतात. ते केवळ प्रेमच करत नाहीत, तर जोडीदाराच्या स्वातंत्र्याचाही पूर्ण आदर करतात. प्रत्येक नात्‍यात जबाबदारीने वागतात.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो.

मूलांक ६ चे पुरुष आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करतात. पत्नीची इच्छा त्यांच्यासाठी शिरसावंद्य असते. हे लोक नात्यात कधीही कमतरता भासू देत नाहीत.

येथअे क्‍लिक करा.