जोकोव्हिच @100, जाणून घ्या 'विम्बल्डन'मधील ऐतिहासिक कामगिरी
पुढारी वृत्तसेवा
टेनिसमधील सर्वाधिक 24 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांची नोंद असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिच यानेआणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.
जोकोव्हिचने रविवारी विम्बल्डनमधील १०० वा सामना जिंकला. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.
विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम रोजर फेडरर (105 विजय) याच्या नावावर आहे.
विम्बल्डन स्पर्धा सलग दोनवेळा आणि सलग चारवेळा जिंकण्याचा अनोखा विक्रमही जोकोव्हिचच्या नावावर आहे.
दोन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये 100 पेक्षा अधिक विजयांची नोंद करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
38 वर्षीय जोकोव्हिच आपल्या कारकिर्दीतील 20वे विम्बल्डन स्पर्धा खेळत आहे.
जोकोव्हिचने आतापर्यंत विम्बल्डन स्पर्धा सातवेळा जिंकली आहे.
सर्वाधिकवेळा बिम्बल्डन जिंकण्याचा विक्रम स्वित्झर्लंडच्या रोजर फेडरर (८ वेळा)च्या नावावर आहे.
यंदा विम्बल्डनवर नाव कोरत फेडररच्या विक्रमाशी बरोबर करण्याचे जोकोव्हिचचे लक्ष्य आहे.
येथे क्लिक करा...