पुढारी वृत्तसेवा
तेलामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं, टाळू निरोगी राहतो आणि केसगळती कमी होते.
रात्री तेल लावल्यास टाळूला पुरेसा वेळ मिळतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
घाईत तेल लावल्याने नीट मसाज होत नाही, शिवाय धूळ चिकटण्याचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, रात्री तेल लावून सकाळी केस धुणं जास्त फायदेशीर ठरतं.
कोमट खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा बदाम तेल केसांसाठी उपयुक्त ठरतात.
हलक्या हाताने 10–15 मिनिटं मसाज केल्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचतं
कांद्याचा रस, कोरफडीचा गर आठवड्यातून 1–2 वेळा वापरल्यास फायदा होतो.
अंडी, पालक, बदाम यांसारखे प्रथिने व लोहयुक्त पदार्थ केसांसाठी आवश्यक.
नियमित तेल लावणं आणि योग्य काळजी घेतल्यास केसांची वाढ दिसू लागते.