पुढारी वृत्तसेवा
पायांचे फोटो विकून कमाई करण्याचा वेगळाच ट्रेंड चर्चेत आहे.
9 ते 5 नोकरीसोबत लोक आता वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवत आहेत
लोक त्यांच्या पायांचे फोटो क्लिक करून इंटरनेटवर विकतात
काही लोक 5,000 रुपये तर काहीजण 1 लाखांपेक्षा जास्त कमाई करत असल्याचा दावा करत आहेत
भारतामध्ये हे कायदेशीर आहे का तर हो, पण यासाठी काही अटी आहेत.
महत्त्वाच्या अटी काय आहेत: व्यक्ती प्रौढ असावी, फोटो स्वतःचे असावेत, फोटो अश्लील नसावेत
IT Act 2000 आणि IPC अंतर्गत अश्लील कंटेंट शेअर करणं गुन्हा ठरू शकतं
लोक फोटो इंटरनॅशनल वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकतात
रिस्क काय आहे: प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते, ओळख उघड होण्याची भीती, अकाउंट हॅक किंवा कंटेंट लीक होण्याचा धोका आहे.
अशा ट्रेंडमध्ये रिस्क असते, त्यामुळे नीट विचार करुन कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घ्या