आर जे महवशसोबतच्या त्याच्या या फोटोंनी हे दोघे डेटिंग करत असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे चाहत्यांचे मत आहे .सध्या दोघांनीही काही फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये मागील लोकेशन बऱ्यापैकी सारखे आहे..यावरून दोघेही सीक्रेट व्हेकेशनवर आहेत की काय अशी शंका त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.महावशने लंडनच्या पार्श्वभूमीवरचे फोटो शेयर केले आहेत..त्याचवेळी चहलने त्याच ठिकाणचे क्लोज बॅकग्राऊंड असलेले फोटो शेयर केले आहेत.अर्थात या दोघांनीही आपण एकत्र सुट्ट्या घालवत असल्याच्या बातमीवर कोणतीही रिएक्शन दिलेली नाही.अलीकडेच युजवेंद्र चहलने त्याच्या आणि महावशच्या नात्याबाबत कपिलच्या शोमध्ये बोलताना सांगितले होते की पूर्ण इंडिया त्याचे रिलेशनशिप स्टेटस जाणून आहे.धनश्रीसोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल एका सामन्यादरम्यान महावशसोबत दिसला होता.त्यानंतर या दोघांच्या रिलेशनबाबत चर्चा सुरू झाली