Anirudha Sankpal
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
हा भारताच्या इन्फास्ट्रक्चरमधील सर्वात मोठा माईलस्टोन म्हणून गणला जात आहे.
तब्बल १९ हजार ६५० कोटी रूपयांच्या या प्रोजेक्टची धुरा ही अदानी पोर्टकडं होती.
या विमानतळाचं डिझाईन हे प्रसिद्ध आर्किटेक्ट स्वर्गवासी झाहा हदीद यांच्या फर्मनं केलं होतं.
हे नवी मुंबईचं विमानतळ हे मुंबईच्या विस्ताराचं आणि आधुनिक प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात आहे.
या विमानतळाचं डिझाईन निवडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
त्यातील भारताचं राष्ट्रीय फूल कमळाच्या आकाराचं डिझाईन निवडण्यात आलं.
या विमानतळाच्या टर्मिनल्ससाठी स्टील, काच यांचा वापर करण्यात आला आहे.
विमानतळाचं डिझाईन तुम्हाला शांततेची अनुभूती देतं.
तसंच नवी मुंबईचं विमानतळ हे भारताचे सिम्बॉल्स आणि आधुनिक एव्हिएशन इंजिनिअरिंगचा मिलाफ आहे.