मोहन कारंडे
टीम इंडियाने आशिया कप २०२५ जिंकला! मात्र, एका नाट्यमय घटनेमुळे खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच आनंदोत्सव साजरा केला.
भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचे मंत्री, पीसीबी (PCB) आणि एसीसी (ACC) चे प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेतली नाही.
भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच जल्लोष केला. कर्णधार सूर्यकुमार यादवने अशी अॅक्शन केली की, जणू त्यांच्या हातात ट्रॉफी आहे आणि तो ती घेऊन सहकारी खेळाडूंकडे जात आहे.
सगळे खेळाडू ट्रॉफी हातात असल्याचा अभिनय करत सेलिब्रेट करू लागले. आता ही ट्रॉफीशिवाय आनंद साजरा करण्याची कल्पना कोणाची होती? आता त्या खेळाडूचे नाव समोर आले आहे.
टीम इंडियाचा स्पिनर वरुण चक्रवर्तीने त्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
वरुण चक्रवर्तीने मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित सीएट अवॉर्ड सेरेमनीमध्ये सांगितले की, ही कल्पना अर्शदीप सिंगने दिली होती.
संपूर्ण टीमच्या एकतेने ट्रॉफीची कमतरता भरून काढली.
वरुणचा मजेशीर किस्सा सोशल मीडियावर व्हायरल.