पुढारी वृत्तसेवा
नवीन कपडे धुतल्यानंतर रंग फिका होतोय? काही सोप्या ट्रिक्स वापरून कपड्यांचा रंग जास्त काळ टिकवता येतो.
पहिल्यांदा धुण्यापूर्वी कपडे थंड पाण्यात मीठ मिसळून 20-30 मिनिटे भिजवा. यामुळे रंग स्थिर राहण्यास मदत होते.
गरम पाण्याऐवजी नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने कपडे धुवा. त्यामुळे रंग लवकर निघत नाही.
कपडे धुण्यापूर्वी ते उलटे (Inside Out) करा. यामुळे बाहेरील रंगाचे संरक्षण होते.
सौम्य (Mild) डिटर्जंटचा वापर करा. जास्त तीव्र डिटर्जंटमुळे कपड्यांचा रंग लवकर फिका पडू शकतो.
कपडे थेट कडक उन्हात वाळवू नका. सावलीत वाळवल्यास रंग अधिक काळ टिकतो.
गडद आणि फिक्या रंगांचे कपडे वेगवेगळे धुवा. यामुळे रंग पसरण्याचा धोका कमी होतो.
या सोप्या ट्रिक्स नियमित वापरल्यास नवीन कपड्यांचा रंग अधिक काळ ताजा, चमकदार आणि आकर्षक दिसू शकतो.