Nail Health: नखांमधील 'हे' बदल असू शकतात गंभीर आजारांचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

नखांचा रंग बदलतोय? पांढरे, पिवळे, निळसर किंवा काळपट नखं शरीरातील काही गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात.

Nail Health Signs | pinterest

नखांवर उभे किंवा आडवे पट्टे? पोषणतत्त्वांची कमतरता, वाढते वय किंवा काही आजारांमुळे असे बदल दिसू शकतात.

ठिसूळ आणि तुटणारी नखं

वारंवार तुटणारी नखं आयर्न, बायोटिनची कमतरता किंवा थायरॉईड समस्येचे लक्षण असू शकतात.

चमच्यासारखी वाकलेली नखं

अशी नखं अनेकदा शरीरातील आयर्नच्या कमतरतेकडे इशारा करतात.

नखं जाड आणि पिवळी झाली आहेत?

हे बुरशीजन्य संसर्ग किंवा काही दीर्घकालीन आजारांशी संबंधित असू शकते.

नखांवर पांढरे डाग दिसतात?

प्रत्येक वेळी कॅल्शियमची कमतरता कारणीभूत नसते; दुखापत किंवा इतर कारणांमुळेही हे डाग दिसू शकतात.

नखांभोवती सूज किंवा लालसरपणा

सतत सूज, वेदना किंवा पू दिसत असल्यास संसर्गाचे लक्षण असू शकते. दुर्लक्ष करू नका.

नखांतील बदलांकडे दुर्लक्ष नको!

नखांचा रंग, आकार किंवा पोत अचानक बदलल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

येथे क्लिक करा...