Dog Breeds | तुमच्या रक्षणासाठी 'या' 10 कुत्र्यांच्या प्रजाती जीवसुद्धा देतील

अविनाश सुतार

जर्मन शेफर्ड (German Shepherd):

धाडसी आणि बुद्धिमान, जर्मन शेफर्ड अतिशय सहज प्रशिक्षण घेणारा श्वान आहे. पोलिस व लष्कर तपासासाठी या प्रजातीवर अवलंबून असतात

रॉटवाइलर (Rottweiler)

ताकदवान आणि शूर, रॉटवाइलर नैसर्गिक रक्षक आहे. कुटुंबासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी तो नेहमी लढण्यास तयार असतो

बेल्जियन मेलिनॉइस (Belgian Malinois)

अतिशय जागरूक आणि चपळ बेल्जियन मेलिनॉइस संरक्षणाच्या कामासाठी सर्वाधिक योग्य ठरतो. आपल्या मालकाच्या सुरक्षेसाठी तो तत्पर असतो

डोबर्मन पिन्शर (Doberman Pinscher)

चपळ, वेगवान आणि धाडसी डोबर्मन कुटुंबाच्या धोक्याच्या वेळी सज्ज असतो

बुलमॅस्टिफ (Bullmastiff)

बलवान शरीरयष्टीचे बुलमॅस्टिफ घुसखोरांना क्षणार्धात थांबवू शकतात, मात्र, कुटुंबीयांशी मात्र प्रेमळ असतात

अकिता (Akita)

अकिता या प्रजातीच्या कुत्र्यांचा स्वभाव अत्यंत निष्ठावान असतो. संरक्षणात्मक वृत्तीमुळे ते आपल्या कुटुंबाशी घट्ट जोडलेले असतात

ग्रेट पायरेनीज (Great Pyrenees)

सुरुवातीला जनावरांचे रक्षण करण्यासाठी विकसित केलेले ग्रेट पायरेनीज घर व कुटुंबासाठी रक्षक आहेत

अनाटोलियन शेफर्ड (Anatolian Shepherd)

स्वतंत्र आणि दृढनिश्चयी अनाटोलियन शेफर्ड ही प्रजाती मालमत्ता आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी सक्षम असते

बॉक्सर (Boxer)

संरक्षणशील आणि खेळकर स्वभावाचे बॉक्सर एखादा धोका जाणवताच झपाट्याने समोर येतात

केन कॉर्सो (Cane Corso)

मजबूत शरीरयष्टीचे केन कॉर्सोची कुटुंबाशी नाळ घट्ट असते, जागरूकतेने रक्षण करतात

येथे क्लिक करा.