Neerputhoor Shiva Temple | हे पाण्यात असलेले ३००० वर्षांपूर्वीचे मंदिर पाहून मंत्रमुग्ध व्हाल!

Namdev Gharal

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील नीरपुथूर शिव मंदिर (Neerputhoor Shiva Temple) हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक अद् भूत मंदिर आहे

याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्‍याची अद्वितीय रचना आणि पाशर्वाभूमीमुळे गर्भगृह सतत नैसर्गिक पाण्याने वेढलेले असते. स्थानिक लोकमान्यतेनुसार हे मंदिर सुमारे ३००० वर्षे जुने मानले जाते

हे मंदिर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील एडप्पाळ जवळील वट्टमकुलम (Vattamkulam) या शांत आणि निसर्गरम्य ग्रामीण भागात वसलेले आहे.

मल्याळम आणि तमिळ भाषेत 'नीर' (Neer) चा अर्थ पाणी असा होतो. ज्या स्थानाभोवती जलकुंड आहे, त्या भौगोलिक रचनेवरूनच या गावाला आणि मंदिराला ‘नीरपुथूर’ हे नाव मिळाले.

मंदिरात पाणी कसे येते: हे मंदिर सखल भागात अशा ठिकाणी बांधले आहे जिथे जमिनीखालील पाण्याचा नैसर्गिक स्रोत सतत कार्यरत असतो.

भूगर्भातील झऱ्यांमुळे विहिरीसारख्या खोलगट भागात बांधलेल्या या मंदिराच्या गर्भगृहाभोवती पाणी वर्षभर टिकून राहते.

उन्हाळ्यात आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळी खालावली, तरी येथील जलकुंड कधीही पूर्णपणे आटत नाही. पावसाळ्यात पाण्याची पातळी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत चढते, तर इतर ऋतूंमध्ये ती गर्भगृहाभोवती स्थिर राहते.

प्राचीन काळी ऋषीमुनींनी जलस्रोताच्या सान्निध्यात शांत वातावरणात शंकराची स्थापना करून येथे तपश्चर्या केली होती, अशी पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा आहे.

शिवलिंग पाण्याच्या मध्यभागी असल्याने मंदिराचे मुख्य पुजारी थेट पाण्यात उतरून शिवलिंगावर अभिषेक आणि पूजाविधी संपन्न करतात. भाविकही पाण्यातून मार्ग काढत दर्शन घेतात.

केरळच्या पारंपरिक वास्तुनियमांनुसार लाकूड आणि जांभ्या दगडाचा वापर करून ही रचना उभारली आहे. नारळी-सुपारीच्या बागा आणि पाण्याचा मंद गारवा यामुळे येथे शांतता अनुभवता येते.

काळी मिरी Black Gold