Black Pepper|काळी मिरी: ‘एक चिमूट’ मसाल्यांचा राजा पचनक्रियेसाठी वरदान!

Namdev Gharal

काळी मिरी किंवा ब्लॅक पेपर याला मसाल्यांचा राजा म्हटले जाते. प्रत्‍येक पदार्थाची चव वाढवण्याचे, खास करण्याचे काम हा छोटासा पदार्थ करतो

या मिरीसाठी युरोपियन व्यापारी पहिल्यांदा भारतभूमीत आले व पुढे राज्यकर्तेही झाले. असा हा पदार्थ आरोग्यासाठी विषेशता पचनक्रियेसाठी वरदान ठरत असतो

काळ्या मिरीचे मूळ भारतातील पश्चिम घाट (केरळ) मधील आहे. प्राचीन काळात याला ‘काळे सोने’ (Black Gold) म्हटले जायचे; रोमन साम्राज्यात नाण्यांऐवजी मिरीचा वापर चलनासारखा केला जाई.

१४९८ मध्ये वास्को द गामा काळ्या मिरी आणि मसाल्यांच्या थेट व्यापारासाठी केरळमधील कालिकत बंदरावर पोहोचला. नंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि अखेर ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले.

पचनशक्तीसाठी वरदान : रोजच्या जेवणात फक्त एक चिमूट काळी मिरी घातल्यास हायड्रोक्लोरिक ॲसिड (HCl) चे प्रमाण वाढते, ज्यामुळे अन्न सहज पचते. गॅस, ॲसिडिटीपासून आराम मिळतो

काळ्या मिरीतील 'पायपरीन' (Piperine) हे घटक शरीरातील पेशींचे रक्षण करते आणि शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवते

खोकला, सर्दी आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी मध किंवा कोमट पाण्यासोबत चिमूटभर मिरी गुणकारी ठरते.

हळदीमधील 'कर्क्युमिन' (Curcumin) शरीरात शोषून घेण्यासाठी काळी मिरी आवश्यक आहे; एक चिमूट मिरी हळदीचे शोषण अनेक पटीने वाढवते.

काळ्या मिरीच्या बाहेरील थरामध्ये चरबी पेशी (Fat Cells) तोडण्याची क्षमता असते. शरीराचा चयापचय दर (Metabolism) वाढवून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देते.

पायपरीन मेंदूची स्मरणशक्ती सुधारण्यास आणि ताणतणाव कमी करण्यास मदत करते. यात नैसर्गिक सूजरोधक (Anti-inflammatory) गुणधर्म असल्याने सांधेदुखी आणि सूज कमी होते.

मात्र हे लक्षात ठेवा अती प्रमाणात सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते, त्यामुळे 'फक्त एक चिमूट' हे प्रमाण उत्तम.