Panic Breathing: दबावात असताना मेंदू काम करत नाही... वापरा आर्मीची १६ सेकंदाची ही ट्रीक

Anirudha Sankpal

दबावाच्यावेळी आपला मेंदू सर्वात कार्यक्षम असावा असं सर्वांना वाटत असतं. मात्र होत याच्या उलटंच... मेंदू काम करायचंच बंद करतो.

काही सुचत नाही अशी परिस्थितीत आर्मीची एक १६ सेकंदाची ट्रीक कामी येऊ शकते.

हे तंत्र मूळचे जपानी 'आमा' (Ama) डायव्हर्सचे आहे, जे ४०० वर्षांपासून कोणत्याही उपकरणाशिवाय समुद्रात खोलवर सूर मारतात.

याला 'बॉक्स ब्रीदिंग' (Box Breathing) असे म्हणतात, जे भीतीवर नियंत्रण मिळवून मेंदूला पुन्हा सक्रिय करण्यासाठी वापरले जाते.

सुरुवातीला ४ सेकंद नाकाने दीर्घ श्वास आत घ्या (Inhale). घेतलेला श्वास पुढील ४ सेकंदांसाठी रोखून धरा (Hold).

त्यानंतर हळुवारपणे ४ सेकंद श्वास तोंडाने बाहेर सोडा (Exhale). श्वास पूर्ण बाहेर सोडल्यानंतर पुन्हा ४ सेकंद श्वास न घेता थांबून राहा.

श्वास सोडण्याच्या प्रक्रियेमुळे शरीरातील 'वॅगस नर्व्ह' (Vagus Nerve) सक्रिय होऊन हृदयाचे ठोके आणि तणाव वाढवणारे 'कोर्टिसोल' कमी होते.

यामुळे मेंदूचा 'प्रिफ्रंटल कॉर्टेक्स' भाग पुन्हा सक्रिय होतो, ज्यामुळे तुम्ही दबावाखाली असतानाही स्पष्टपणे विचार करू शकता.

हे तंत्र भीती पूर्णपणे काढून टाकत नाही, तर भीती असूनही तुम्हाला अचूक कृती करण्याची आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता देते.

येथे क्लिक करा