Plucking Nose Hair: सावधान! नाकातील केस मुळासकट काढणं जिवावर बेतू शकतं

Anirudha Sankpal

नाकाच्या वरच्या भागापासून ते ओठांच्या कोपऱ्यापर्यंतच्या भागाला वैद्यकीय भाषेत 'डेंजर ट्रँगल ऑफ द फेस' (Danger Triangle of the Face) असे म्हणतात.

नाकातील केस मुळासकट उपटल्यामुळे तिथे जखम होते आणि रक्तावाटे जंतूंना शरीरात शिरकाव करण्यासाठी थेट मार्ग मोकळा होतो.

या भागातील रक्तवाहिन्या थेट मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरेशी (Cavernous Sinus) जोडलेल्या असतात.

नाकातील जखमेतून होणारा संसर्ग (Infection) या रक्तवाहिन्यांद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचण्याची भीती असते.

यामुळे 'कॅव्हरनस सायनस थ्रॉम्बोसिस' (Cavernous Sinus Thrombosis) सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो, ज्यामुळे मेंदूत रक्ताची गाठ तयार होऊ शकते.

या संसर्गामुळे मेंदूला सूज येणे, अर्धांगवायूचा झटका (Stroke) येणे किंवा दृष्टी जाणे यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

नाकातील केस हे नैसर्गिक 'फिल्टर' असून ते धूळ आणि जंतूंना फुफ्फुसांत जाण्यापासून रोखतात, ते काढल्याने रोगप्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

डॉक्टर नेहमी सल्ला देतात की नाकातील केस उपटू नयेत, तर केवळ लहान कात्रीने (Trimmer) बाहेरून कापून कमी करावेत.

येथे क्लिक करा