Navratri Akhand Jyot : नवरात्रोत्सवात पहिल्या दिवशी पासूनच प्रज्वलित करा अखंड ज्योत

अंजली राऊत

भारतीय परंपरेनुसार घरात नवरात्रोत्सवात अखंड ज्योत पेटते, त्या ठिकाणी देवीचा वास असतो

वास्तूशास्त्रानुसार, अखंड ज्योतीची ज्योत, रंग आणि दिशा यामधून अनेक प्रकारचे संकेत मिळतात, जे शुभ आणि अशुभ असे दोन्ही असू शकतात

धार्मिक मान्यतेनुसार अखंड ज्योत ही सोन्यासारख्या रंगाची असेल तर धन-धान्यामध्ये समृद्धी होण्याचे संकेत असतात

अखंड ज्योतीची दिशा वारंवार पूर्व किंवा उत्तरेकडे जात असेल तर हा देवी तुमच्यावर प्रसन्न असल्याचा संकेत मानला जातो

धार्मिक मान्यतेनुसार अखंड ज्योत प्रज्वलित केल्यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी येते, वादविवाद संपतात

नवरात्रीमध्ये अखंड ज्योत याचा अर्थच आहे, ती ज्योत विझू न देणे, ज्योत विझणे हे कामात अडथळा येण्याचे संकेत आहे

महत्वाचे म्हणजे नवरात्रोत्सवात एकदा अखंड ज्योत (दिवा) लावल्यानंतर त्या दिव्याची वात सतत बदलू नका, एकाच वेळी मोठी वात लावून ती प्रज्वलित करा

Multani Mitti : मुलतानी माती लावताना 'या' गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे
Multani Mitti : मुलतानी माती लावताना 'या' गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे