अंजली राऊत
दोन थेंबाचे चमत्कारीक फायदे
रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये दोन थेंब टाकून विशिष्ट तेल लावले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे होतात. तसेच काही आजार देखील चुटकीसरशी दूर होऊ शकतात
सांधेदुखी, ओठ फाटले तर
सरसो तेलाचे दोन तीन थेंब नाभीत टाकावेत, हे चमत्कारीक असून प्राचीन उपाय आहे.
त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल
चेहऱ्यावरील मुरुम
कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब नाभीमध्ये टाकून नाभीभोवती थोडी मालीश करा. त्यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल
चेहऱ्यावरील तेज
नाभीत बदाम तेलाचे दोन ते तीन थेंब टाका. झटपट परिणाम दिसेल व चेहराही चमकदार दिसेलच, पण तुमचा रंगही उजळेल
त्वचा मुलायम होण्यासाठी
आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा होण्यासाठी गावरान, देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब नाभीत लावायचे. त्वचा अगदी बाळासारखी मऊ होईल.
नैसर्गिक प्राचीन उपचार पद्धती
माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ हे नाभीशी संलग्न असते. ही माहिती उपयुक्त असून वात, पित्त, कफ या त्रिदोष प्रकृती वर आणि शरीर रचनेवर अवलंबून आहेत. तरीही नाभी उपचार पद्धती ही नैसर्गिक उपचार पद्धती प्राचीन असून अवश्य करून पाहा.