Snake Prevention Tips | 'हे' वास ठेवा घराजवळ; साप आपोआप पळून जातील

पुढारी वृत्तसेवा

साप हे जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहेत. ते विषारी असल्याने जीवघेणे ठरू शकतात

उद्यान, जंगल, तलाव किंवा खडकाळ भागाजवळ घर असेल, तर साप दिसण्याची शक्यता अधिक असते

घराजवळ साप येऊ नये यासाठी अनेक उपाय केले जातात, मात्र खालील दिलेला उपाय सापांना दूर ठेवण्यास मदत करतो

काही विशिष्ट वास सापांना अजिबात सहन होत नाहीत आणि त्या वासाने ते लगेच दूर पळून जातात

सापांना पुदीना आणि तुळशीचा वास सहन होत नाही. घरात किंवा बागेत ही झाडे लावल्यास साप दूर राहण्यास मदत होते आणि वातावरणही ताजेतवाने राहते

लसूण आणि कांद्याचा तीव्र वास सापांना आवडत नाही. हे ठेचून घराच्या आसपास किंवा साप येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी टाकता येते

सापांना धूर खूप त्रासदायक असतो. घराजवळ साप असल्याची शंका वाटल्यास कोरडी पाने किंवा अगरबत्ती जाळून धूर केल्यास साप दूर पळू शकतात

लिंबाचा रस, व्हिनेगर आणि दालचिनी तेलाचे काही थेंब समान प्रमाणात मिसळून त्याचे मिश्रण घराभोवती फवारल्यास त्याच्या वासामुळे साप दूर राहतात

अमोनियाचा तीव्र वासही सापांना आवडत नाही. साप येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अमोनिया असलेले छोटे भांडे ठेवल्यास साप दूर राहण्यास मदत होते

येथे क्लिक करा