Mosquito Repellent: डास पळवण्याची नैसर्गिक, केमिकल विरहीत अन् आयुर्वेदिक पद्धत

Anirudha Sankpal

रासायनिक कॉइल्स किंवा स्प्रेऐवजी सुगंधी वनस्पती आणि आयुर्वेदिक तेलांचा वापर करून डास सुरक्षितपणे पळवता येतात.

विशिष्ट तीव्र गंधाचा वापर करून डासांच्या संवेदनांना भ्रमित करणे आणि त्यांना दूर ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या उपायासाठी कापूर, लवंग तेल, नीलगिरी तेल, कडूनिंब तेल आणि खोबरेल किंवा मोहरीचे तेल आवश्यक आहे.

कोमट तेलात १० ग्रॅम कापूर, प्रत्येकी १५-२० थेंब लवंग व नीलगिरी तेल आणि १ चमचा नीम तेल मिसळून द्रावण तयार करा.

कापसाचे बोळे या तेलात भिजवून ते खोलीच्या कोपऱ्यात, खिडक्यांजवळ किंवा कपाटात ठेवा.

कापूर डासांच्या मज्जासंस्थेला बाधित करतो, तर लवंग आणि नीलगिरी तेल त्यांच्या तीव्र वासामुळे कीटकांना दूर ठेवतात.

कडूनिंब तेल नैसर्गिक कवच म्हणून काम करते आणि या मिश्रणाचा प्रभाव दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते.

हा उपाय धूरमुक्त, विषमुक्त आणि रसायनांपासून सुरक्षित असल्याने घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी उत्तम आहे.

हे मिश्रण थेट त्वचेवर लावू नका, मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या आणि आगीपासून दूर ठेवा.

येथे क्लिक करा