Masala Paan: मसाला पान घरी कसं बनवायचं? विकतच्या पानापेक्षाही लागेल भारी!

पुढारी वृत्तसेवा

जेवणानंतर काहीतरी गोड आणि पाचक हवंय? मग बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा 'मसाला गोड पान'!

लागणारे साहित्य: नागवेलीची ताजी पाने, चुना, कात, गुलकंद, बडीशेप, सुपारी, खोबरे, वेलची, लवंग, पान सुगंधी मसाला, पान चटणी, तुटी-फ्रुटी आणि चेरी.

सर्वप्रथम पानाची ताजी पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावीत. पानाचा देठ कापून काढून टाकावा.

पानाला सुरुवातीला अगदी थोडा चुना आणि कात व्यवस्थित लावून घ्यावा. यामुळे पानाला विशिष्ट चव येते.

आता पानावर आवडीनुसार भरपूर गुलकंद पसरवून घ्यावा. हा पानातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

त्यावर आता चवीनुसार बडीशेप, बारीक केलेली सुपारी,मसाला आणि किसलेले सुके खोबरे टाकावे.

पानाची रंगत वाढवण्यासाठी त्यात वेलची पूड, रंगीत तुटी-फ्रुटी आणि चेरीचे तुकडे घालावेत.

सर्व मसाला भरून झाल्यावर पानाची व्यवस्थित त्रिकोणी घडी घालावी.

हे पान बटर पेपरमध्ये गुंडाळून थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.