पुढारी वृत्तसेवा
ओठांवरील डेड स्कीन काढा
आठवड्यातून २ वेळा साखर + मध वापरून हलके स्क्रबिंग केल्यास काळी त्वचा निघून जाते.
तुप किंवा नारळ तेल लावा
रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप किंवा नारळ तेल लावल्यास नैसर्गिक गुलाबीपणा येतो.
लिंबाचा योग्य वापर करा
लिंबू + मध लावल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते (थेट लिंबू लावणे टाळा).
बीटरूटचा नैसर्गिक रंग
बीटाचा रस ओठांवर लावल्यास नैसर्गिक पिंक टिंट येतो.
पाणी जास्त प्या
डिहायड्रेशनमुळे ओठ काळे पडतात, त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
धूम्रपान आणि तंबाखू टाळा
सिगारेट, गुटखा, तंबाखूमुळे ओठांवर कायमस्वरूपी काळपटपणा येतो.
लिप बाम वापरा
SPF असलेला लिप बाम वापरल्यास सूर्यामुळे होणारा काळपटपणा कमी होतो.
केमिकलयुक्त लिपस्टिक टाळा
स्वस्त व केमिकलयुक्त लिपस्टिकमुळे पिगमेंटेशन वाढते.
नियमित काळजी महत्त्वाची
एक-दोन दिवसात परिणाम होत नाही; सातत्याने काळजी घेतल्यासच फरक दिसतो.