पुढारी वृत्तसेवा
रेझर-वॅक्सिंगमुळे त्वचेचे नुकसान
रेझर किंवा वॅक्सिंगमुळे त्वचा लाल होते, रॅशेस येतात आणि काही वेळा केस जाड होण्याची शक्यता वाढते.
घरगुती उपाय अधिक सुरक्षित
नैसर्गिक घटक वापरल्यास त्वचेला इजा न होता हळूहळू फेशियल हेअर कमी करता येतात.
बेसन + हळद प्रभावी कॉम्बिनेशन
बेसन केसांना मुळापासून कमकुवत करते, तर हळद अँटीबॅक्टेरियल असल्याने त्वचा सुरक्षित ठेवते.
दूध किंवा गुलाबजल मिसळा
या मिश्रणामुळे त्वचा कोरडी न होता मऊ आणि चमकदार राहते.
हळूहळू केस कमी होतात
हा उपाय नियमित केल्यास केसांची वाढ मंदावते आणि केस पातळ होऊ लागतात.
पिंपल्स आणि टॅनही कमी होतो
हा लेप चेहऱ्यावरील टॅन, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.
संवेदनशील त्वचेसाठी योग्य
केमिकल नसल्यामुळे संवेदनशील त्वचेलाही हा उपाय सुरक्षित मानला जातो.
कसा वापर कराल?
बेसन + चिमूटभर हळद + दूध/गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावा, सुकल्यावर उलट्या दिशेने चोळून काढा.
स्वस्त, सोपा आणि नैसर्गिक उपाय
महागड्या ट्रीटमेंटऐवजी हा उपाय घरच्या घरी सहज करता येतो.