Natural camphor mosquito repellent |डास पळवण्यासाठी नैसर्गिक कापूर धूप कसा बनवावा?

स्वालिया न. शिकलगार

साहित्य:भीमसेनी कापूर, साधा कापूर ४ चमचे पूड

कडुनिंबाची वाळलेली पाने: १ कप बारीक पावडर लवंग: १०-१२ (पूड)

ओवा: २ चमचे बारीक पूड, तूप / कडुनिंबाचे तेल: २-३ चमचे

साहित्याची पावडर तयार करा

कडुनिंब, लवंग, ओवा, कापूर एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या

चाळून घ्या. मिश्रण मळून घ्या. पावडरमध्ये ३ चमचे देशी गाईचे तूप घालून हाताने घट्ट मळा

Ghee | Pinterest

धूप कांडी किंवा कोनाचा आकार द्या, लहान साचे देखील वापरू शकता.

धूप-कोन कडक उन्हात वाळवून घ्या

संध्याकाळी खिडक्या-दारे बंद करून धूप पेटवा

यातील कापूर, कडुनिंब, ओव्याच्या धुरामुळे डास लगेच पळून जातात.

Traditional home decor ideas|जुन्या घरांना द्या रॉयल लूक! खांब-भिंती सजवण्याच्या जबरदस्त आयडियाज