अंजली राऊत
सुमारे 310 कोटींच्या खर्चातून बांधलेली न्यायालयीन सात मजली इमारत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे
महाराष्ट्रात एकमेव नाशिक जिल्हा न्यायालयात असलेले 'एस्केलेटर' येथे आहे. या इमारतीत 45 न्यायालये, सरकारी अभियोक्ता कक्ष, मोठे ग्रंथालय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पक्षकारांना बसण्यासाठी विस्तृत जागा, स्वतंत्र हिरकणी कक्ष आहे
सुमारे पाच लाख चौरस फुटाचे बांधकाम असणारी ही पर्यावरणपूरक भव्य इमारत उभारणीमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत
700 आसनक्षमतेचे सभागृह, 500 चारचाकी वाहनक्षमता आणि 1000 दुचाकी वाहनक्षमता असलेली स्वतंत्र पार्कींग इमारत आहे
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सध्या पर्यंतच्या महत्वाच्या वकीलांची छायाचित्रे आता हेरीटेज गॅलरीमध्ये लावली जाणार आहेत. तसेच विविध प्रकारची शिल्पे, चित्र आणि वारली चित्रकलेचे दर्शनही येथे घडत आहे
शनिवारी (दि.27 सप्टेंबर 2025) रोजी जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले