Narakya | नरक्या : सह्याद्रीतील 'कॅन्सरवरील रामबाण' वनस्पती, पेटंट मात्र जपानकडे!

Namdev Gharal

पश्चिम घाटातील एक दुर्मीळ वनस्पती म्हणजे नरक्या : Nothapodytes nimmoniana असे याचे शास्त्रिय नाव असून, ही सह्याद्रीच्या रांगांमध्ये आढळणारी एक अत्यंत दुर्मिळ आणि बहुमूल्य औषधी वनस्पती आहे.

कॅन्सरवरील रामबाण उपाय म्हणून ही जगप्रसिद्ध आहे , या वनस्पतीच्या लाकूड, साल आणि मुळांमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळवण्याची नैसर्गिक क्षमता असते.

नरक्यामध्ये 'कॅम्प्टोथेसिन' (Camptothecin - CPT) नावाचे अत्यंत प्रभावी अल्कलॉइड आढळते, जे आधुनिक कर्करोग संशोधनाचा पाया आहे.

कॅन्सर पेशींवर थेट वार: हे रसायन मानवी शरीरातील कर्करोगाच्या घातक पेशींचे विभाजन आणि वाढ रोखून त्यांना नष्ट करण्यास मदत करते.

ही वनस्पती प्रामुख्याने गर्भाशय (Ovarian), स्तन (Breast), आतडे (Colon) आणि फुफ्फुसांच्या कर्करोगावरील आधुनिक केमोथेरपी औषधांमध्ये याचा कच्चा माल म्हणून वापर होतो.

जागतिक पातळीवर केमोथेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'टोपोटेकान' आणि 'इरिनोटेकान' या औषधांच्या निर्मितीसाठी नरक्याचे घटक अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

जपानने पेटंट कसे मिळवले? : जपानने संपूर्ण वनस्पतीवर नव्हे, तर नरक्याच्या लाकडातून हा सक्रिय घटक शुद्ध स्वरूपात वेगळा करण्याच्या तंत्रज्ञानावर पेटंट मिळवले आहे.

प्रचंड तस्करी आणि संकट : औषध निर्मितीसाठी १९९० च्या दशकात पश्चिम घाटातून या झाडांची मुळासकट तोड होऊन मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तस्करी झाली.

अतिशोषण आणि अंदाधुंद तोडीमुळे ही बहुमूल्य वनस्पती आज 'अतिसंकटग्रस्त' श्रेणीत पोहोचली आहे.

नरक्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी भारत सरकारने तिच्या बेकायदेशीर तोडीवर, वाहतुकीवर आणि लाकडाच्या निर्यातीवर अत्यंत कडक कायदेशीर बंदी घातली आहे.

पोकळा भाजी फायदे