पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात हवेतील ओलावा वाढल्यामुळे घरात अनेकदा कुबट वास येऊ लागतो.
हा दुर्गंधी घालवण्यासाठी डांबरगोळी आणि कापूर हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत.
डांबरगोळ्या कपाटातील कपड्यांना कीड आणि ओलाव्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
मात्र, डांबरगोळ्यांचा तीव्र वास काहींना त्रासदायक ठरू शकतो.
दुसरीकडे, कापूर हा नैसर्गिक असल्याने तो हवेतील शुद्धता राखण्यास मदत करतो.
कापराच्या सुगंधामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि ताजेतवाने राहते.
कपाटासाठी डांबरगोळी उत्तम, तर हॉल किंवा बेडरूममधील हवेसाठी कापूर वापरावा.
तुमच्या गरजेनुसार योग्य निवड करा आणि पावसाळ्यातही घर सुगंधी ठेवा.