पुढारी वृत्तसेवा
ऐतिहासिक संदर्भ
नागपंचमीचा सण आणि महाभारतातील एक विशेष घटना यांचा खूप जवळचा संबंध आहे.
राजा जनमेजयाचा सूड
राजा जनमेजयाने आपल्या पित्याच्या (परीक्षित राजा) मृत्यूचा बदला घेण्यासाठी 'सर्पसत्र' यज्ञ केला होता.
सापांचा संहार
या महायज्ञात जगातील सर्व सापांची आहुती दिली जात होती, ज्यामुळे सर्पसृष्टी धोक्यात आली होती.
आस्तिक ऋषींची मध्यस्थी
सापांना वाचवण्यासाठी आस्तिक ऋषींनी राजा जनमेजयाला प्रार्थना करून हा यज्ञ थांबवला.
सापांचे संरक्षण
ज्या दिवशी हा यज्ञ थांबला आणि सापांचे प्राण वाचले, तो दिवस म्हणजे 'श्रावण शुद्ध पंचमी'.
दुधाचा अभिषेक
यज्ञाच्या उष्णतेमुळे होणारी सापांची जळजळ कमी करण्यासाठी त्यांच्यावर दूध आणि पाणी शिंपडण्यात आले.
परंपरेची सुरुवात
तेव्हापासून सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीला नागपूजा करण्याची प्रथा सुरू झाली.
श्रद्धा आणि भक्ती
आजही नागपंचमीला नागाची पूजा करून त्यांना दूध अर्पण केले जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.