Lahya Benefits: वजन कमी करण्यापासून पचनक्रियेपर्यंत! 'लाह्या' खाण्याचे 'हे' आहेत 7 भन्नाट फायदे

पुढारी वृत्तसेवा

लाह्या केवळ पूजेसाठीच नाही, तर आरोग्यासाठी एक उत्तम 'सुपरफूड' आहेत.

लाह्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास हा उत्तम पर्याय आहे.

lahya

यात फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

लाह्यांमध्ये कॅल्शियम मुबलक असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

canva photo

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर लाह्या खाल्ल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते.

लाह्या लो-फॅट असल्याने त्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करतात.

ज्यांना ग्लूटेनची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी लाह्या हा एक सुरक्षित आणि पौष्टिक आहार आहे.

Allergy problem

तुम्ही लाह्यांचा चिवडा, भेळ किंवा दुधासोबत सेवन करून त्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकता.

येथे क्लिक करा...